• + ९१ - ७८८७९२९८६१
  • marketing@pashusakhi.in

पशूसखी सामाजिक संस्था

संस्था नोंदणी अनुक्रमणिका
  • संस्था नोंदणी अधिनियम 1860, 21 - महा/566/2019/पुणे
  • मुंबई अधिनियम क्र. 29, 1950 - F53683/पुणे
  • ISO 9001-2015 NO - QMS/902020/ XXX
  • DARPAN NO. - MH/2022/0330628
संस्थेचा बँक तपशील
  • बँकेचे नाव - बँक ऑफ महाराष्ट्र
  • बँक अकाऊंट नाव - सनज्योत बहुउद्देशीय संस्था
  • अकाऊंट नंबर - 60353079685
  • IFSC कोड - MAHA0000160
  • शाखा - माळेगाव,बारामती.
संस्थे विषयी थोडक्यात

गरजु निराधारांना मायेचा हात, सनज्योत देईल सर्वाना साथ.

  • स्त्री भ्रन हत्या
  • ज्येष्ठ नागरिक वृध्दाश्रम मदत
  • प्राणीमात्रा सेवा
  • मोफत आरोग्य तपासणी
  • आम्ही कोरोना योध्दा



  • राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित
  • शिवजयंती उत्सव २०२२
  • हळदी कुंकु समारंभ
  • कंपोस्ट खत निर्मिती
  • समुपदेशन COUNSELING आपल्यादारी
पशू सखी अभियान विषयक

पशु सखी: ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा नवा किरण

पशु सखी हे ग्रामीण भागातील महिलांसाठी एक क्रांतिकारी अभियान आहे, ज्याचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना पशुपालनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करणे आहे. या अभियानात महिलांना व्हेटर्नरी प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्या कुशल पशुपालक आणि पशु वितरक बनू शकतात. यामध्ये त्यांना गाई गोठा व्यवस्थापन, पशु आरोग्य देखरेख, आणि दूध उत्पादनाच्या शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

सनज्योत बहुउद्देशीय संस्था यांचा पशू सखी हा महिलांसाठी अभिनव उपक्रम

आज जरी शहरी भारतात महिला साक्षरतेचे प्रमाण 64% आहे, परंतु ग्रामीण भागात महिला साक्षरतेचे प्रमाण निम्मे आहे, म्हणजेच जवळजवळ 31%. महिलांच्या साक्षरतेच्या या कमी दरामुळे ते केवळ महिलांचे जीवनच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक आणि देशाच्या आर्थिक विकासालाही नुकसान करीत आहेत. शिक्षण आणि कौशल्याचा अभाव लक्षात घेता, सनज्योत बहुउद्देशीय संस्था विविध शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास भर देत आहे.

पशूसखी सामाजिक संस्था

दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या,तर कधी वतसल्यापूर्ण माता,तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमालतेने त्या निभावीत आहेत, असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परवलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवर ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत.

आजच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विशेष चर्चेचा विषय आहे. आपल्या आधिग्रंथांमध्ये स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन सांगण्यात आले आहे की “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:” अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे देवता वास करतात. पण गंमत पहा स्त्रियांमध्ये इतकी शक्ती असूनही त्यांच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे

महिलांना समाजात सन्मानाचे स्थान, महिलांच्या समस्या व गरजेची जाण ठेवून सनज्योत बहुउद्देशीय संस्था या संस्थेची स्थापना.. .. .. .. रोजी करण्यात आली. स्थापनेनंतर महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणाचे उद्दिष्ट ठेवून त्यांचे अन्न, आरोग्य, कौशल्य विकास, आर्थिक निर्णय, उत्पन्न, मालमत्ता, शिक्षण व इतर गोष्टींची उपलब्धता देऊन ते त्यांना त्यांचा सामाजिक स्तर उंचाऊ पाहते.

व्हिजन

"प्रत्येक ग्रामीण महिला आत्मनिर्भर आणि कुशल पशुपालक बनावी, ज्यामुळे स्वच्छ, ताजे आणि भेसळमुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचतील, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल."

मिशन

पशु सखी अभियानाचा उद्देश ग्रामीण महिलांना व्हेटर्नरी प्रशिक्षण आणि गाई गोठा व्यवस्थापनाचे ज्ञान देऊन कुशल पशुपालक आणि पशु वितरक म्हणून घडवणे आहे. या अभियानाद्वारे महिलांना स्वच्छ आणि भेसळमुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि बाय-प्रॉडक्ट्स तयार करून विक्री करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गोठ्यातून थेट ग्राहकांपर्यंत गुणवत्तापूर्ण उत्पादन पोहोचवण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान मिळवणे हे या अभियानाचे अंतिम उद्दिष्ट आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ पासुन राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे आणि अशाप्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन वाढविणे, वैरणीची उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे,

पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, नाविण्यपूर्ण उपक्रमांस प्रोत्साहन देणे असा आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये होणाऱ्या उत्पादनांसाठी विक्रीकरितां आणि त्यांना चांगल्या दर्जाचा कच्चा माल उपलब्ध होणेकरितां संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकता विकास साधणे ही आहे.

योजनेचा उद्देश - रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातून प्रजाती विकासधारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात.

पात्रता निकष -

१. अर्जदार स्वतः किंवा त्यांच्याकडील तज्ञ हे प्रकल्पाशी संबंधित प्रशिक्षित तसेच अनुभव असणे आवश्यक.

२. अर्जदारास त्याचे खाते असलेल्या शेडयुल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक.

३. प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन आवश्यक तसेच KYC साठी आवश्यक कागदपत्रे.

४. अर्जदाराने अर्ज ऑनलाईन सादर करताना द्यावयाची आवश्यक कागदपत्रे.

क) सविस्तर प्रकल्प प्रस्ताव

ख) प्रशिक्षण प्रमाणपत्र

ग) अनुभव प्रमाणपत्र

घ) जमिनीशी संबंधित कागदपत्र (स्वत:ची किंवा भाडेकरार) ७/१२

च) प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र

छ) स्वतःचे भांडवल / बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा.

ज) पॅनकार्ड

झ) वास्तव्य पुरावा